सत्तेचे
विकेन्द्गीकरण
करण्याचे
महाराष्ट्र
शासनाचे
धोरणानुसार
यवतमाळ जिल्हा
परिषदेची
स्थापना
१ मे १९६२
रोजी झाली.
जिल्हयाच्या
भौगोलीक
स्थितीचे
वर्णन करावयाचे
झाल्यास
यवतमाळ जिल्हा
उत्तर अक्षांश
१९.२६ व २०.४२
आणि पूर्व
रेखांश ७७.१८
व ७९.९८ या
दरम्यान
वसलेला आहे
जिल्हयाची
एकुण लोकसंख्या
२४,५८,२७१
(२००१ च्या
जनगणनेप्रमाणे
) असून त्यापैकी
१२,६५,६८१
पुरुष व ११,९२,५९०
स्त्रिया
आहेत. एकूण
लोकसंख्येपैकी
ग्रामीण
२०,०१,०६०
व शहरी ४,५७,२११
लोकसंख्या
आहे. एकूण
लोकसंख्या
स्त्रियांचे
प्रमाण ४८.५२
व पुरुषांचे
प्रमाण ५१.४८
आहे. जिल्हयाचे
साक्षरतेचे
प्रमाण ७०.६२
इतके आहे.
जिल्हयात
एकूण १६ तालुके
असून ८ तालुक्याचे
मुख्यालयी
नगरपालीका
व ८ तालुके
ग्रामपंचायत
क्षेत्रात
आहेत.